Ration Card Number: 12 अंकी आधार नंबर वरून रेशन कार्ड नंबर काढा फक्त 1 मिनिटात

Ration Card Number जसे आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे तसेच एखाद्या व्यक्तीच्या रहिवासाचा दाखला किंवा राहण्याचे ठिकाण समजून येण्यासाठी रेशन कार्ड हे देखील तितकेच महत्त्वाचे कागदपत्र आहे. खरं म्हणजे आधारकार्ड येण्याआधी देशाचे नागरिकत्व सिद्ध करणारे एकमेव कागदपत्र म्हणजे रेशनकार्ड मानले जात होते. आधी रेशनकार्डच्या माध्यमातून धान्य, रॉकेल मिळत असे परंतु आता अनेकजण या रेशनकार्डवरून रेशन किंवा इतर सुविधा घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांचे रेशनकार्ड असतेच असे नाही. मग हे रेशनकार्ड मिळवायचे कसे हे जाणून घ्यायचे असेल तर आजचा लेख जरुर वाचा. कारण तुम्ही तुमच्या आधारकार्डच्या 12 अंकी आकड्याच्या मदतीने तुमचे रेशनकार्ड मिळवू शकता. Ration Card Number

नागरिकांच्या ओळखपत्रांचे डिजिटलायझेशन

सध्या डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी सोप्या आणि अगदी वेळ वाचवणाऱ्या झाल्या आहेत. आपल्याला घरच्या घरी आपल्या मोबाईलवरुन आपले ओळखपत्र अपडेट करता येते. ओळखपत्रासाठी अर्ज देखील करता येतो. आता आपण घरबसल्या आपले आधारकार्ड देखील अपडेट करु शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात डिजिटलायझेशन झाले आहे. मग आपल्याकडे रेशनकार्ड नसेल तर आपण आपले रेशन कार्ड आपल्या आधारकार्डच्या 12 अंकी आकड्यावरुन मिळवू शकतो. Ration Card Number

असा काढा तुमचा रेशनकार्ड नंबर  फक्त 1 मिनीटात  

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard Mera Ration ऍप मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

  • 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक काढण्यासाठी  तुम्ही खालील प्रक्रिया  फॉलो करा
  • सर्वात प्रथम मोबाईलच्या प्ले स्टोअर वरून Mera Ration हे ॲप डाऊनलोड करा. वरती या ऍपची लिंक देखील दिली आहे. लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही ऍप डाऊनलोड करु शकता.
  • Mera Ration ॲप डाऊनोड केल्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल चे Location सुरू करावे लागेल.
  • एप्लिकेशन्स सुरू केल्या नंतर तुम्हला विविध पर्याय दिसतील त्यापैकी  Aadhar Seeding हा पर्याय निवडा.
  • अता त्या अंतर तुमच्या समोर Aadhar Card Number आणि Ration Card Numbar हे 2 पर्याय दिसतील
  • त्यापैकी Aadhar Card Number हा पर्याय निवडा आणि तेथे तुमचा आधार कार्ड नंबर नमूद करा. आणि सबमीट बटणावर क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमचे आधारकार्ड कनेक्ट असलेल्या रेशनकार्डची संपूर्ण माहिती समोर दिसू लागले.
  • त्यामुध्ये तुम्हाला रेशन Card Number हा तुमचा 12 अंकी SRC Number असेल.  

अशा प्रकारे तुम्ही तुमचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक मिळवू शकता. Ration Card Number

रेशन कार्डचे असण्याचे फायदे समजून घेऊ

  • दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेशन दुकानातून अनुदानित दरात धान्य मिळविण्यासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो.
  • रेशन कार्ड हे  संपूर्ण भारतात अधिकृत ओळखीचे स्वीकृत स्वरूप  समजले जाते. ते शासनातर्फे देण्यात येते त्यामुळे नागरिक त्याचा ओळखपत्र म्हणून देखील वापर करु शकतात.  
  • पॅन कार्ड किंवा आधारकार्डसाठी अर्ज करताना ते ओळखीचा पुरावा म्हणून  रेशन कार्ड हेच कागदपत्र वापरले जाते.
  • बँकेत नवीन खाते सुरु करण्यासाठी किंवा एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यात नाव ट्रान्सफर करण्यासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज समजला जातो.
  • नवीन मतदार ओळखपत्र काढायचे असल्यास सर्वात आधी रेशनकार्ड विचारले जाते.
  • मोबाईल सिम कार्ड खरेदी करण्यासाठी देखील रेशन कार्डची झेरॉक्स मागितली जाते.
  • पासपोर्टसाठी अर्ज करताना रेशनकार्ड अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज समजला जातो.  
  • वाहन चालक म्हणून परवाना मिळविण्यासाठीचा अर्ज करताना रेशनकार्ड हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणून जोडले जाते.
  • तुम्हाला घरात नवीन एलपीजी कनेक्शन मिळवायचे असल्यास तुम्हाला रेशन कार्ड दाखवणे अत्यावश्यक असते. रेशनकार्ड नसेल तर तुम्हाला नवीन LPG कनेक्शन मिळणे अवघड होऊ शकते.
  • कोणत्याही प्रकारचा विमा काढताना रेशनकार्ड हा ओळखीचा दस्तावेज म्हणून वापरला जातो.

या सर्व बाबींमधून एक गोष्ट सिद्ध होतो की रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्ही रेशन दुकानातून धान्य घेत असाल किंवा नसाल, तुम्हला धान्य मिळस असेल किंवा नसेल काहीच फरक पडत नाही. तुमचे रेशनकार्ड जपून ठेवा. आणि जर का सापडत नसेल तर आधार कार्ड नंबरवरुन ते ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता. Ration Card Number

Leave a Comment