भारत हा लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारलेला देख आहे. येथे लोकांमधून प्रतिनिधी निवडले जातात. आणि त्या प्रतिनिधींमार्फत शासन व्यवस्था चालवली जाते. त्यासाठी दर पाच वर्षांनी विविध स्तरावरच्या निवडणूका होतात. या निवडणूकांमधून नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात. परंतू निवडणूकांच्या माध्यमातून निवडून देण्यासाठी मतदार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मानले गेले आहे. मतदार कार्ड त्याच नागरिकांना मिळते ज्यांचे नाव मतदार यादीत असते. जर मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला पुन्हा मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन तुमच्या मतदार कार्ड बद्दल विचारणा करावी लागेल. आता या सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत आपण घरबसल्या देखील आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासू शकतो. म्हणूनच आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मतदार यादीत स्वतःचे नाव कसे तपासायचे हे जाणून घ्या. Search Name in Voter list
लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत
लोकसभा निवडणकांचा तारखा जाहीर झाल्या आहेत. दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या तारखांच्या दरम्याने संपूर्ण देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. आणि या निवडणूकांचा निकाल 4 जून 2024 रोजी सर्व नागरिकांना पहायला मिळणार आहे. त्यावरुन ठरेल की भारतात कोणते सरकार येणार आहे. तुम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी मतदार नोंदणी केली असले तर तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का हे घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. Search Name in Voter list
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी काय माहीत असावे?
मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून पाहण्यासाठी आपल्याकडे काही आवश्यक माहीती असणे आवश्यक असते. आपल्या मतदार कार्डवर EPIC Number म्हणजेच Electors Photo Identification Card असतो त्याच्या मदतीने किंवा मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी तुम्हाला नाव, वय, जन्म तारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघाची माहीत असणे अत्यंत आवश्यक असते. Search Name in Voter list
मतदार यादीत मध्ये नाव कसे तपासायचे ते पाहू.
- सर्वात आधी आपल्याला गुगल वर Voters service Portal लिहून सर्च करा.
- किंवा electoralsearch.eci.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
- भारत निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तीन पर्याय मिळतील.
- पहिल्या पर्यायात तुम्ही तुमची माहिती भरुन तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासू शकता.
- दुसऱ्या पर्यायात search by EPIC म्हणजेच Electors Photo Identification Card नुसार तुमचे नाव शोधता येते.
- आणि तिसऱ्या पर्यायात तुमचा मतदार कार्ड नोंदणी करतानाचा मोबाईल नंबर टाकून तुमचे नाव मतदार यादीत शोधता येते. Search Name in Voter list
पहिला पर्याय आहे Search by Details
Search by Details या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही तुमेच नाव मतदार यादीत तपासत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम राज्य निवडावे लागेल आणि भाषा निवडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, वय, तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ याची संपूर्ण माहीती भरावी लागेल. ही माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोडद्वारे सर्च करावे लागेल. आणि अगदी काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल.
Search Name in Voter list ONLINE दुसरा पर्याय आहे Search by EPIC
Search by EPIC हा पर्याय तुम्ही निवडला तर, तुम्हाला Electors Photo Identification Card क्रमांक माहित असणे गरजेचे असते. तो प्रत्येकाच्या मतदार कार्डवर असतो. सर्वप्रथम राज्य निवडा आणि तुमची भाषा निवडा. Electors Photo Identification Card हा नंबर आपल्या मतदार कार्डवर असतो. तो तुमच्याकडे आधी लिहिलेला असले तर समोर दिसत असलेल्या कोष्टकात भरा. आणि कॅप्चा कोड टाकून सर्च करावे लागेल. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल. Search Name in Voter list
तिसरा पर्याय आहे Search by Mobile
Search by Mobile या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला राज्य आणि भाषेची निवड करावी लागेल, नंतर तुमचा रजीस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून send OTP नावाच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या सर्च ऑप्शनला क्लिक करावे लागेल. सर्चवर क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदात तुमचे नाव स्क्रिनवर येईल. परंतु त्यासाठी आधी तुम्ही मतदार नोंदणी केलेली असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. Search Name in Voter list